28 September 2020

News Flash

इंग्लंडच्या मैदानावर पहिल्यांदाच घडला ‘हा’ प्रकार

इंग्लंड-आयर्लंड वन डे सामन्यातील घटना

ICCच्या वर्ल्ड कप सुपर लीग स्पर्धेत आयर्लंडने आपले गुणांचे खाते उघडले. पहिल्या दोनही सामन्यात सहज विजय मिळवणाऱ्या इंग्लंडला आयर्लंडने मालिकेत निर्विवाद वर्चस्व मिळवून दिले नाही. कर्णधार इयॉन मॉर्गनच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२८ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. पण पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी या दोघांच्या शतकांच्या बळावर आयर्लंडने ४९.५ षटकात हे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर लीगमध्ये १० गुणांची कमाई केली.

या सामन्यात एक गोष्ट क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने दमदार फलंदाजी करत शतक लगावले. त्याने ८४ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावा केल्या. याचसोबत आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बल्बर्नीनेदेखील धडाकेबाज शतक ठोकले. त्याने ११२ चेंडूत १२ चौकारांसह ११३ धावा केल्या. इंग्लंडच्या मैदानावर दोनही कर्णधारांनी एकाच वन डे सामन्यात शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. याआधी असा पराक्रम कोणत्याही सामन्यात करणं शक्य झालं नव्हतं.

दरम्यान, मॉर्गनच्या शतकासोबतच सामन्यात टॉम बँटन (५८) आणि डेव्हिड विली (५१) यांनी झळकावलेली अर्धशतके आणि टॉम करनची नाबाद ३८ धावांची खेळी यामुळे इंग्लंडने ५० षटकात ३२८ धावांपर्यंत मजल मारली. ३२९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंग आणि अँड्र्यू बल्बर्नी या दुसऱ्या क्रमांकाच्या जोडीने तब्बल २१४ धावांची भागीदारी केली. स्टर्लिंगने १२८ चेंडूत ९ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १४२ धावा केल्या. तर बल्बर्नीने ११२ चेंडूत १२ चौकारांसह ११३ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत केविन ओब्रायनच्या निर्णायक फटकेबाजीच्या (१५ चेंडूत नाबाद २१) जोरावर आयर्लंडने ७ गडी आणि १ चेंडू राखून सामना जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 10:04 am

Web Title: eng vs ire first time in cricket both captains scored century in odi on england soil eoin morgan andrew balbirnie vjb 91
Next Stories
1 प्रो कबड्डीचे प्रक्षेपण हक्क लिलावाद्वारे?
2 जैव-सुरक्षा नियमाचा भंग केल्यास शिक्षा!
3 अमेरिकन टेनिस स्पर्धेतून नदालची माघार
Just Now!
X