इंग्लिश प्रीमियर लीग

मोहम्मद सालाहच्या हॅट्ट्रिकमुळे लिव्हरपूलने लीड्स युनायटेडचे आव्हान ४-३ असे परतवून लावत इंग्लिश प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमाची शानदार सुरुवात केली.

तब्बल ३० वर्षांनंतर गेल्या मोसमात प्रीमियर लीगचे विजेतेपद मिळवणाऱ्या लिव्हरपूलवर पहिल्याच सामन्यात गुण गमावण्याची वेळ ओढवली होती. पण मोहम्मद सालाह लिव्हरपूलसाठी तारणहार ठरला.

चौथ्या मिनिटाला सालाहने पेनल्टीवर गोल के ल्यानंतर लीड्सने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. जॅक हॅरिसन (१२व्या मिनिटाला) आणि पॅट्रिक बॅमफोर्ड (३०व्या मिनिटाला) यांच्या गोलमुळे लीड्सने सामन्यात पुनरागमन के ले. त्याआधी विर्जिल व्हॅन डिकने २०व्या मिनिटाला लिव्हरपूलसाठी गोल झळकावला होता. ३३व्या मिनिटाला सालाहने दुसरा गोल झळकावत लिव्हरपूलला ३-२ असे आघाडीवर आणले. दुसऱ्या सत्रात ६६व्या मिनिटाला माटेस्झ क्लिच याने गोल करत लीड्सला बरोबरी साधून दिली. सामना संपायला अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना सालाहने पेनल्टीवर गोल करत लिव्हरपूलच्या विजयावर नाव कोरले.