News Flash

मँचेस्टर सिटीवर एव्हरटनचा विजय

एव्हरटन संघाने बलाढय़ मँचेस्टर सिटीचा २-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी खळबळजनक विजयाची नोंद केली. या पराभवामुळे जेतेपद पटकावण्याच्या मँचेस्टर सिटीच्या आशेला धक्का

| March 17, 2013 02:59 am

एव्हरटन संघाने बलाढय़ मँचेस्टर सिटीचा २-० असा पराभव करून इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी खळबळजनक विजयाची नोंद केली. या पराभवामुळे जेतेपद पटकावण्याच्या मँचेस्टर सिटीच्या आशेला धक्का पोहोचला आहे.
१० जणांसह खेळणाऱ्या एव्हरटनला लिओन ओस्मान याने ३२व्या मिनिटाला सुरेख गोल करून आघाडीवर आणले. त्यानंतर सामना संपायला काही सेकंद शिल्लक असताना निकिका जेलाव्हिच याने गोल करून एव्हरटनच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अन्य सामन्यांच, अर्सेनलने स्वानसी सिटी संघाचा २-० असा पाडाव करून पाचव्या क्रमांकावर मजल मारली आहे. नाचो मॉनरियल आणि गेर्विन्हो यांनी अर्सेनलसाठी गोल केले. गॅब्रियल अ‍ॅग्बोनलेहर, आंद्रियास वेईमान, ख्रिस्तियान बेनलेके यांच्या गोलमुळे अ‍ॅस्टन व्हिलाने क्वीन्स पार्क रेंजर्स संघावर ३-२ अशी मात केली. क्वीन्स पार्ककडून जर्मेन जेनास आणि आंद्रोस टोव्हसेन्ड यांनी गोल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 2:59 am

Web Title: everton won against manchester city 2
Next Stories
1 फिर वहीं कहानी..
2 वॉटसनचे बंड झाले थंड!
3 विजयी सांगता करण्याचा भारताचा निर्धार
Just Now!
X