08 March 2021

News Flash

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमवर लैगिंक शोषणाचे आरोप

वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही

पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम याच्यावर एका महिलेनं लौगिंग शोषणाचे आरोप केले आहेत. या महिलेनं स्वत:ला बाबर आजमची शाळेतील मैत्रीण असल्याचं सांगितलं. या महिलेनं पत्रकार परिषद घेत बाबर आजमवर लैगिंक शोषणाचे आरोप केले आहेत. बाबर आजमला वेळप्रसंगी आर्थिक मदत केल्याचा दावाही या महिलेनं केला आहे.

पत्रकार परिषदेत महिला म्हणाली की, बाबर आजमला मी शाळेत असल्यापासून ओळखतेय. आम्ही एकत्र शिकलो आहे. एकाच ठिकाणी राहत असल्यामुळे आमच्यात चांगली मैत्रीही झाली होती. २०१० मध्ये बाबर आजमनं लग्नासाठी मला प्रपोज केलं होतं. माझाही होकार होता. मात्र आमच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे २०११ मध्ये बाबर मला पळवून घेऊन गेला. त्यानं मला वेगवेगळ्या ठिकणावर ठेवलं. काही दिवसानंतर त्यानं लग्न करण्याचा आपला निर्णय बदलला. इतकेच नाही तर पोलिसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

पाकिस्तानी पत्रकार साज सादिक यांनी आपल्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती महिला बाबर आजमवर आरोप करत असल्याचं दिसते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 11:42 am

Web Title: exploited me for 10 years gave false promises of marriage woman accuses babar azam of sexually abusing her nck 90
Next Stories
1 कोणी विकेट देतं का विकेट?? टीम इंडियाच्या गोलंदाजांची अपयशाची मालिका सुरुच
2 या संघाच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकणार नाही !
3 पाकिस्तानी पत्रकाराची भारतावर स्लो-ओव्हर रेटवरुन टीका, वासिमभाई म्हणतात…हमको घंटा फरक नही पडता !
Just Now!
X