नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध क्रीडा समालोचक जसदेव सिंग यांचे मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ८७व्या वर्षी अखेरचा श्वास घेणाऱ्या सिंग यांच्या पश्चात त्यांचा मुलगा व मुलगी असा परिवार आहे.१९७० ते ८० च्या दरम्यान सिंग यांनी रवी चतुवेर्दी आणि सुशील दोषी यांच्यासह अनेक क्रीडा सामन्यांचे समालोचन केले.१९६८ ते २००० पर्यंतच्या अनेक ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सिंग यांनी समालोचकाची भूमिका पार पाडली आहे. दरम्यान राज्याचे केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.