25 February 2021

News Flash

फेडररची स्वप्नवत वाटचाल

नदालविरुद्ध झालेल्या मागील चारही सामन्यांत फेडररने बाजी मारली आहे.

फेडररची स्वप्नवत वाटचाल

 

मोसमातील तिसरे जेतेपद; नदालवर सलग चौथा विजय

वयाची पस्तिशी ओलांडलेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने २०१७च्या टेनिस हंगामात स्वप्नवत वाटचाल कायम राखत कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालला नमवण्याची किमया केली. मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने हंगामात तिसऱ्यांदा समोर आलेल्या नदालवर स्वित्र्झलडच्या खेळाडूने सहज मात केली. रविवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत फेडररने ९४ मिनिटांच्या खेळात नदालवर ६-३, ६-४ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.

दुखापतीमुळे मागील मोसमातील दुसऱ्या सत्राला मुकलेल्या फेडररने कठोर मेहनत घेत शारीरिक तंदुरुस्ती मिळवत २०१७ मध्ये तीन जेतेपदे नावावर केली. चालू हंगामात फेडररची आत्तापर्यंतची जय-पराजयाची आकडेवारी ही २०-१ अशी आहे. दुबई येथे झालेल्या स्पध्रेत रशियाच्या एव्हगेनी डोनस्कोयने त्याला नमवले होते. नदालविरुद्ध झालेल्या मागील चारही सामन्यांत फेडररने बाजी मारली आहे.

बॅकहॅण्ड खेळाने सर्वाना आकर्षित करणाऱ्या फेडररने मियामीच्या अंतिम लढतीत फोरहॅण्डचा अप्रतिम खेळ करताना नदालला नामोहरम केले. तंदुरुस्ती आणि शरीराची वेगवान हालचाल पाहून चाहत्यांना तरुण तडफदार फेडरर आठवला. नदाल पाचव्यांदा मियामी स्पध्रेच्या अंतिम फेरीत खेळला, परंतु त्याची जेतेपदाची पाटी यंदाही कोरीच राहिली. असे असले तरी फेडररविरुद्धच्या जय-पराजयाच्या आकडेवारीत नदाल २३-१४ असा आघाडीवर आहे. हार्ड कोर्टवर ही आकडेवारी फेडररच्या (१०-९) बाजूने आहे.

सानिया-बाबरेरा नवोदितांकडून पराभूत

महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत भारताच्या सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार चेक प्रजासत्ताकच्या बाबरेरा स्ट्रायकोव्हा यांना बिगरमानांकित गॅब्रियला डाब्रोवस्की आणि झू यिफान यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कॅनडा-चीनच्या या खेळाडूंनी ६-४, ६-३ अशा फरकाने विजय मिळवला आणि सानिया-बाबरेराचे तिसरे जेतेपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.

गेले काही आठवडे अविश्वसनीय होते. मी आता २४ वर्षांचा तरुण नाही. त्यामुळे परिस्थिती बदलली आहे आणि त्यामुळे फ्रेंच खुल्या स्पध्रेपर्यंत मी मातीच्या कोर्टवर खेळण्याचे टाळणार आहे.

रॉजर फेडरर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 3:55 am

Web Title: federer beat nadal in miami open 2017
Next Stories
1 चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द व्हावी-शास्त्री
2 नेयमारचा शतकी गोल!
3 दशकपूर्तीचा सोहळा
Just Now!
X