23 October 2020

News Flash

मेक्सिकोचा विजयारंभ

धुवाँदार पावसात रंगलेल्या उत्साही मुकाबल्यात मेक्सिकोने कॅमेरूनवर १-० अशी मात केली आणि विश्वचषक स्पध्रेचा विजयारंभ केला. ‘फुटबॉलची खरी मजा पावसातच’ या उक्तीचा प्रत्यय या लढतीने

| June 14, 2014 03:12 am

धुवाँदार पावसात रंगलेल्या उत्साही मुकाबल्यात मेक्सिकोने कॅमेरूनवर १-० अशी मात केली आणि विश्वचषक स्पध्रेचा विजयारंभ केला. ‘फुटबॉलची खरी मजा पावसातच’ या उक्तीचा प्रत्यय या लढतीने दिला. सामना सुरू झाल्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि निर्धारित वेळेपर्यंत वरुणराजाने सामन्याचा आस्वाद घेण्याचा निर्णय घेतला. ओरिबे पेराल्टाने नोंदवलेला एकमेव गोल मेक्सिकोच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
६१व्या मिनिटाला पेराल्टाने गोल केला, परंतु कॅमेरूनचा गोलरक्षक इतांजेने चेंडू अडवला. मात्र या प्रयत्नांत चेंडूने पुन्हा उसळी घेतली. या उसळीचा पुरेपूर फायदा घेत पेराल्टाने गोल केला आणि मेक्सिकोच्या चाहत्यांच्या जल्लोषाला उधाण आले. १-० आघाडी वाया न घालवण्याचा निर्धार मेक्सिकोने केला, परंतु कॅमेरूनच्या खेळाडूंनी जोरदार टक्कर देत संघर्ष सुरूच ठेवला. सामना संपायला काही मिनिटे असताना कॅमेरूनच्या बेनोइट इकोटोचा गोल करण्याचा जोरदार प्रयत्न मेक्सिकोच्या ओचाओने जबरदस्त झेप लगावत थोपवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 3:12 am

Web Title: fifa world cup mexico beat cameroon 1 0
टॅग Fifa World Cup
Next Stories
1 उद्घाटन सोहळ्याचे प्रक्षेपण वाहिनीद्वारे बेरंग
2 गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमित शाह
3 विश्वचषक हॉकी स्पर्धा : नवव्या स्थानासाठी भारताची द. कोरियाशी झुंज
Just Now!
X