21 September 2020

News Flash

अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या महिला उपांत्य फेरीत

महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपदाच्या दिशेने दमदार घोडदौड करताना दिल्लीचा १८-१३ असा पराभव केला आणि अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

| January 24, 2014 12:41 pm

 महाराष्ट्राच्या महिला संघाने विजेतेपदाच्या दिशेने दमदार घोडदौड करताना दिल्लीचा १८-१३ असा पराभव केला आणि अव्वल राष्ट्रीय कबड्डी स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. याचप्रमाणे हरयाणाने पंजाबला २२-१८ असे नामोहरम केले.
पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पध्रेत पुरुषांमध्ये हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या संघाने उपांत्य फेरी गाठली आहे. हरयाणाने धक्कादायक निकालाची नोंद करताना नऊ वेळा राष्ट्रीय विजेत्या भारतीय रेल्वेचे आव्हान संपुष्टात आणले. हा सामना नियोजित वेळे १६-१६ असा बरोबरीत सुटला. त्यानंतर पाच-पाच चढायांच्या डावात हरयाणाने रेल्वेला ७-४ अशा फरकाने हरवले. याप्रमाणे उत्तर प्रदेशने कर्नाटकचा १८-१४ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 12:41 pm

Web Title: first national kabaddi tournament maharashtra women in semifinals
टॅग Kabaddi
Next Stories
1 ..तर भारत हॉकीत पुन्हा महासत्ता बनेल – वीरेन रस्क्विन्हा
2 ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा: सानिया-टेकाऊ जोडी उपांत्य फेरीत दाखल
3 ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपदासाठी ली ना, सिबुलकोव्हा मध्ये लढत
Just Now!
X