News Flash

कसोटी क्रिकेटमध्ये नवीन पर्व, Ashes मालिकेपासून होणार ‘हा’ बदल

१ ऑगस्टपासून Ashes मालिकेला सुरुवात

विश्वचषक स्पर्धेनंतर सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत, त्या Ashes मालिकेकडे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते. या मालिकेपासून कसोटी क्रिकेटमध्ये नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या जर्सीमागे त्यांचं नाव आणि क्रमांक लिहीला जाणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी आपल्या संघाचा लूक सोशल मीडियावर जाहीर केला आहे.

Ashes मालिकेपासून आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टपासून एजबस्टनमध्ये पहिला सामना रंगणार आहे. कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांचा ओढा वाढावा आणि रोडावलेली प्रेक्षकसंख्या आणखी वाढावी यासाठी आयसीसीने कसोटी क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 4:29 pm

Web Title: first time in test cricket ashes jerseys to have players name and number psd 91
टॅग : Australia,England,Icc
Next Stories
1 भावा याचेच पैसे मिळतायत, चहलसाठी सेहवागचं हटके ट्विट
2 चांद्रयान २ च्या मुद्द्यावरून हरभजनचा पाकला टोला, म्हणाला…
3 टी-२० विश्वचषकापर्यंत थांबशील का, विराटच्या विनंतीनंतर धोनीने बदलला निवृत्तीचा निर्णय?
Just Now!
X