क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं लॉर्ड्सचं मैदान हे भारतीय क्रिकेटपटूंसाठीसुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. अशाच खेळाडूंमधील एक नाव म्हणजे सौरव गांगुली Sourav Ganguly. याच क्रिकेटच्या मैदानावरुन सौरवने १९९६ मध्ये क्रिकेटमधील त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या नंतर बरोबर सहा वर्षांनी भारतीय क्रिकेट जगताच्या इतिहासात एक असा दिवस उजाडला होता जो कोणीही विसरु शकलेलं नाही.

२००२ मध्ये खेळल्या गेलल्या एका मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवल्यानंतर सौरवने लॉर्ड्स क्रिकेट मैदानातील बाल्कनीत चक्क शर्ट काढून आनंद साजरा केला होता. तो क्षण आजही अनेकांच्या स्मरणात असून, सोशल मीडियावर त्यासंबंधीचे व्हिहिडोही उपलब्ध आहेत.

Sourav Ganguly
Sourav Ganguly

जिथे चाहते तो दिवस विसरु शकलेले नाहीत तिथे मग खुदद् सौरवही ते क्षण कसा विसरेल? सध्या सुरु असणाऱ्या भारत विरुद्ध इग्लंडच्या सामन्याचं समीक्षण करण्यासाठी म्हणून गेलेल्या ‘दादा’ने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन लॉर्ड्सच्या बाल्कनीतील एक सेल्फी पोस्ट केला. ज्या फोटोवर नासिर हुसैनने त्याच्या या फोटोवर एक विनोदी प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळालं. ‘पुन्हा एकदा लॉर्ड्सवर आलोय… ही तिच जागा जिथून माझ्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात झाली होती’, असं लिहित सौरवने फोटो पोस्ट केला. ज्यावर नासिरने लिहिलं, ‘अरे तू त्याच बाल्कनीत परत उभा आहेस… यावेळी तुला शर्ट घातलेलं पाहून मला खूपच आनंद होतोय.’

वाचा : लोअर परळच्या चाळीतून ‘आशियाई’च्या मैदानात!

एका फोटोमुळे सौरव गांगुली आणि नासिर हुसैन या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेला हा धमाल संवाद सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे.