प्रीमिअर फुटसाल लीगवर कायदेशीर कारवाईवर करण्याचा पवित्रा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) घेतला आहे. भारतीय फुटसाल असोसिएशन ही अनधिकृत असल्याचे एआयएफएफने क्रीडा मंत्रालयाला सांगितले आहे.
‘‘एआयएफएफ ही सर्व प्रकारच्या फुटबॉल स्पर्धासाठीची प्रशासकीय संघटना आहे. यामध्ये भारतामधील फुटसालचाही समावेश आहे. याबाबतचे धोरण यापूर्वीच आम्ही मांडले आहे. फुटसालबाबत मात्र अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही,’’ असे एआयएफएफने राज्य संघटनेला लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १५ ते २४ जुलै या कालावधीमध्ये ही लीग आयोजित करण्यात येणार आहे. ‘‘फुटसाल लीगमध्ये एआयएफएफशी निगडित नाही, हे आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. या स्पर्धेला एआयएफएफने मान्यता दिलेली नाही किंवा एआयएफएफने ही स्पर्धा आयोजित केलेली नाही. भारतीय फुटसाल संघटना ही एआयएफएफ, आशियाई फुटबॉल संघटना आणि फिफा यांची सदस्यही नाही,’’ असे या पत्रामध्ये म्हटले आहे.