इटलीवर पेनल्टी शूटआऊटमध्ये ६-५ अशी मात
युरो चषकात तिसऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीविरुद्धच्या लढाईत जर्मनीने बाजी मारली. पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात विश्वविजेत्या जर्मनीने इटलीवर ६-५ अशी मात करून स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. इटलीने संपूर्ण सामन्यात जर्मनीला कडवी झुंज दिली. दोनही संघांनी आपल्या लौकीकाला साजेसा खेळ दाखवला. पहिल्या हाफपर्यंत दोनही संघांना खातं उघडता आलं नाही. पण फुटबॉल रसिकांना तंत्रशुद्ध आणि रंगतदार सामन्याचा नजराणा अनुभवता आला. दुसऱया हाफमध्ये जर्मनीने आक्रमक पवित्रा घेतला. सामन्याच्या ६५ व्या  मिनिटाला जर्मनीच्या ओझीलने पहिला गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर काही मिनिटात इटलीकडे पेनल्टीची संधी चालून आली. संधीचे सोने करत इटलीच्या बनुचीने गोल करून सामन्यात रंगत आणली. मग सामन्याचा अखेेरपर्यंत दोनही संघांमध्ये कडवे द्वंद्व पाहायला मिळाले. सामन्याचा निर्धारीत वेळ आणि अतिरिक्त वेळेनंतरही कोणत्याही संघाला आघाडी घेता आली नाही. सामना १-१ असा बरोबरीत सुटला. त्यामुळे सामना पेनल्टी शूट आऊटवर येऊन ठेपला. पेनल्टी शूट आऊटमध्येही रोमांच पाहायला मिळाला. पहिल्या पाच पेनल्टीमध्येही सामना २-२ असा बरोबरीत होता. पुढे आणखी पाच पेनल्टी कीक वाढविण्यात आल्यानंतर अखेरच्या क्षणी जर्मनीने आघाडी घेत सामना ६-५ असा जिंकला. विशेष म्हणजे, युरो कपच्या इतिहासात विश्वविजेत्या जर्मनीला आज पहिल्यांदाच इटलीवर मात करता आली आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
world athletics announces cash prizes for gold medallists in paris olympics
विश्लेषण: ॲथलेटिक्स सुवर्णपदकविजेत्यांना ऑलिम्पिकमध्ये रोख पदके… हा निर्णय क्रांतिकारी कसा? मूळ नियम काय आहेत
Michael Vaughan Claims Rohit Sharma to join CSK next year
IPL 2024 : ‘पुढच्या वर्षी रोहित चेन्नईकडून खेळताना दिसणार…’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा मोठा दावा
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात