News Flash

मेसी आणि लीब्रोनच्या शैलीत ग्रीझमनचे गोल

ग्रीझमनच्या योगदानामुळे बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलमध्ये रेयाल बेटिसला ५-२ अशी धूळ चारली.

(संग्रहित छायाचित्र)

ला लिगा फुटबॉल स्पर्धा

फ्रान्सचा नामांकित आघाडीपटू आणि बार्सिलोनाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक अँटोइन ग्रीझमनने रविवारी मध्यरात्री संघसहकारी लिओनेल मेसी आणि बास्केटबॉलपटू लीब्रोन जेम्स यांच्या शैलीचे अनुकरण करून दोन गोल नोंदवले. त्याच्या योगदानामुळे बार्सिलोनाने ला लिगा फुटबॉलमध्ये रेयाल बेटिसला ५-२ अशी धूळ चारली.

बेटिससाठी नेबिल फेकिरने १५व्या मिनिटाला पहिला गोल केला; परंतु ग्रीझमनने ४१व्या आणि ५०व्या मिनिटाला दोन गोल नोंदवून बार्सिलोनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यामधील पहिला गोल ग्रीझमनने मेसीच्या शैलीत डाव्या पायाचा कल्पकतेने वापर करून केला, तर गोल केल्यानंतर त्याने जेम्सच्या शैलीत आनंद साजरा केला. ग्रीझमनचा १४ सामन्यांत बार्सिलोनासाठी हा पहिलाच गोल ठरला.

ग्रीझमनव्यतिरिक्त, कार्लस पेरेझ (५६), जॉर्डी अल्बा (६०) आणि अर्टुरो विदाल (७७) यांनीही बार्सिलोनासाठी प्रत्येकी एक गोल केला. जिसस गार्सियाने (७९) बेटिससाठी दुसरा गोल झळकावला; परंतु उर्वरित वेळेत ते तीन गोल करण्यात अपयशी ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 12:44 am

Web Title: griezmann goals in the style of messi and lebron abn 97
Next Stories
1 प्रशिक्षक भावसार आणि दीपिकावर पाच वर्षांची बंदी
2 IND vs WI : भरमैदानात विराटने केलं दांडिया सेलिब्रेशन
3 “बुमराहचा तो सल्ला ऐकला अन् सामना फिरला”; इशांतची प्रामाणिक कबुली
Just Now!
X