भारतीय जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने कलात्मक जिम्नॅस्टिक विश्वचषकातील वॉल्ट स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. जर्मनीतील कोटबस येथे सुरु असलेल्या विश्वचषकाच्या तिसऱ्या दिवशी दीपाने वॉल्ट स्पर्धेत १४.३१६ गुण मिळवत पदक आपल्या नावे केले.

ब्राझीलची रिबेका एंड्रेडने सुवर्ण आणि अमेरिकेच्या झेड कारे ने रौप्य पदक मिळवले. त्रिपुराच्या २५ वर्षीय दीपाने पात्रतेत १६ खेळाडूंमध्ये सहावे स्थान पटकावले होते.

दीपाने तुर्की येथे जुलैत झालेल्या कलात्मक जिम्नॅस्टिक विश्व स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेमध्ये वॉल्ट अंतिम सामन्यात खेळू शकली नव्हती. बॅलन्स बीम वर्गात दीपाचे गुण ११.०६६ होता. ती २३ व्या स्थानी राहिली होती. तर पुरुष वर्गात राकेश पात्रा पॅरलल बार पात्रता सामन्यात १३.०३३ गुणांबरोबर २९ जिम्नॅस्टच्या यादीत तो १६ व्या स्थानावर राहिली.

पुरुष वॉल्ट पात्रता सामन्यात आशीष कुमारलाही चांगली कामगिरी करता आली नाही. तो २७ जणांच्या यादीत २३ व्या स्थानावर राहिला. अरुणा रेड्डी पहिल्या दिवशी गुडघ्याच्या दुखापतीमुळे फ्लोअर स्पर्धेत सहभागी होऊ शकली नव्हती.