News Flash

वेलकम ज्युनियर पांड्या! हार्दिक-नताशा जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव

हार्दिकने फोटो पोस्ट करत दिली गोड बातमी

भारताचा दणकेबाज अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच यांना आज पुत्ररत्न झाले. हार्दिक-नताशा आई-बाबा झाल्याचे हार्दिकने स्वत: ट्विट करून सांगितलं. लॉकडाउन काळात हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चार फोटो पोस्ट करत त्याने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आज हार्दिकने बाळाच्या हातात आपला हात असल्याचा खूप गोंडस फोटो पोस्ट करत साऱ्यांनी ही गोड बातमी सांगितली. त्यानंतर क्रिकेट विश्वासह चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

हार्दिकने लॉकडाउनमध्ये आपली गर्लफ्रेंड नताशा गरोदर असल्याची बातमी दिली होती. तेव्हा त्याने तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. “मी आणि नताशा आमच्या सहजीवनाचा प्रवास आनंदाने करत आहोत आणि आता तो प्रवास अजूनच आनंददायी होणार आहे. नताशा गरोदर असून आता आम्हा दोघांत लवकरच तिसरा जीव येणार आहे. आम्ही या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहोत. याचसोबत तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत”, अशा भावना हार्दिकने व्यक्त केल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 5:42 pm

Web Title: hardik pandya natasa stankovic become proud parents wishes pour in cricket fraternity fans vjb 91
Next Stories
1 हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; फोटो केला शेअर
2 Video : “युवराजच्या ‘त्या’ प्रश्नाचं माझ्याकडे आजही उत्तर नाही”
3 मॅच फिक्सिंग प्रकरण : पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या बंदीच्या शिक्षेत घट
Just Now!
X