अनुजची अष्टपैलू चमक

हॅरिश शील्ड क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी वीके कृष्ण मेनन शाळेने वांद्रे येथील रिझवी स्प्रिंगफिल्ड हायस्कूलला पाच गडय़ानी नमवले. गेल्या १६ वर्षांत प्रथमच रिझवी शाळेला साखळी फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही.

सिद्धेश राईच्या ६९ धावांमुळे रिझवीने किमान १६६ धावा केल्या. परंतु प्रेम सिंग (३९*) आणि शाश्वत कपूर (४१) यांनी कृष्ण मेननला रोमहर्षक विजय मिळवून दिला. अन्य सामन्यात, अनुज गिरीने (५८ धावा आणि ७ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर बॉम्बे स्कॉटिश संघाने सेंट सॅनिस्लॉस शाळेला ४३ धावांनी पराभूत केले.

प्रथम फलंदाजी करताना अनुजच्या दमदार अर्धशतकाला अमन अगरवालच्या ३२ धावांची साथ लाभल्यामुळे बॉम्बे स्कॉटिशने १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरात डावखुरा फिरकीपटू अनुजने सात, तर आर्यमान भानने तीन बळी मिळवून स्टॅनिस्लॉस संघाला ११४ धावांत गुंडाळले.