News Flash

मालिका विजयानंतर विराट-अनुष्काचं Private सेलिब्रेशन

मालिका जिंकल्यानंतरही अनुष्का मैदानात आली होती

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत २-१च्या फरकाने विजयी झाला आहे. हा ऐतिहासिक विजय कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासोबत साजरा केला. भारतीय संघ मालिका विजयाचा चषक जिंकताना अनुष्का तिथेच मैदानावर उपस्थित होती. अनुष्काला मिठी मारत विराटने हा आनंद साजरा केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

भारतीय संघ आणि पती विराटला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का बऱ्याचदा मैदानावर उपस्थित असते. त्यामुळे विजयानंतर अनुष्काच्या चेहऱ्यावरील आनंदही ओसंडून वाहत होता. मालिका विजयाचा चषक उंचावण्याआधी कोहलीने संघातील प्रत्येक खेळाडूचं तोंडभरून कौतुक केलं. कोहलीने विजयाचं संपूर्ण श्रेय संघातील खेळाडूंना दिलं. यानंतर कोहलीने अनुष्कासोबत खास सेलिब्रेशन केले.

 

View this post on Instagram

 

Celebration Post Winning A Historic Game Is Mandatory #viratkohli with his Gorgeous wife #anushkasharma

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

कोहलीने अनुष्काला केक भरवून विजय साजरा करतानाचा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. तसेच एक ग्रुप फोटोही पोस्ट केला आहे. मालिका जिंकल्यानंतरही अनुष्का मैदानात आली होती. तिने विराटसोबत हा आनंद साजरा केला होता.

दरम्यान, या मालिकेत विराटला केवळ १ शतक ठोकत आले. चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत हे दोघे मालिकेत विराटपेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2019 6:42 pm

Web Title: ind vs aus virat kohli feeding cake to anushka sharma while enjoying personal moment
Next Stories
1 IND vs AUS : ‘भारत आर्मी’च्या खास गाण्यावर ऋषभ पंतचा मैदानावर भन्नाट डान्स
2 IPL 2019 : IPL भारतातच; या तारखेपासून रंगणार थरार
3 नवीन वर्षाच्या सुरुवातीला टीम इंडियाची दिवाळी, मालिका विजयासाठी BCCI कडून बोनस जाहीर
Just Now!
X