27 February 2021

News Flash

IND vs ENG : मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराहला विश्रांती; सूर्यकुमारला संधी

सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत….

भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबईचा प्रतिभावान फलंदाज सूर्यकुमार यादवला प्रथमच भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता बळावली आहे. उभय संघांत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर पाच ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय लढती खेळवण्यात येणार आहेत. १२ मार्चपासून अहमदाबाद येथे ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होणार आहे.

‘‘बुमराने गेल्या काही काळात सातत्याने भारताच्या तिन्ही संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे त्याच्यावरील भार हलका करण्यासाठी मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी बुमराला विश्रांती दिली जाऊ शकते. त्याशिवाय ऋषभ पंतचे संघातील पुनरागमन निश्चित मानले जात असून सूर्यकुमारलाही यंदा प्रथमच संजू सॅमसनच्या जागी संघात स्थान मिळू शकते,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

सर्व टी-२० सामने अहमदाबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत…. पाहा वेळापत्रक

१२ मार्च – पहिला टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१४ मार्च – दुसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१६ मार्च – तिसरा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

१८ मार्च – चौथा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

२० मार्च – पाचवा टी-२० सामना, भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 9:07 am

Web Title: ind vs eng t20 series 2021 jaspreet bumrah surya kumar yadav nck 90
टॅग : India Vs England
Next Stories
1 IPL Auction : कोणत्या संघानं कोणाला घेतलं विकत?
2 Video : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आल्यावर अर्जुन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रिया, “मी लहानपणापासूनच…”
3 जोकोव्हिच नवव्यांदा अंतिम फेरीत
Just Now!
X