News Flash

Ind vs NZ : पांडेजी चमकले! रैना-धोनीला टाकलं मागे

चौथ्या टी-२० सामन्यात मनिषचं नाबाद अर्धशतक

मनिष पांडेचं नाबाद अर्धशतक आणि लोकेश राहुलच्या संयमी खेळाच्या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात १६५ धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी खेळाडूंना विश्रांनी देऊन नवीन खेळाडूंना संधी देण्याचा भारताचा प्रयोग या सामन्यात फसला. मात्र मधल्या फळीत मनिष पांडेने संयमीपणे न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत अर्धशतक झळकावलं. ३६ चेंडूत मनिष पांडेने ३ चौकारांच्या सहाय्याने नाबाद ५० धावा केल्या.

या खेळीदरम्यान मनिष पांडेने सुरेश रैना आणि धोनीला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असताना, सर्वात जास्त धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत मनिष पांडे आता दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

मनिष पांडेव्यतिरीक्त लोकेश राहुलनेही चौथ्या सामन्यात आश्वासक फलंदाजी केली. इतर फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत असताना, राहुलने एक बाजू लावून धरत भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. राहुलने ३९ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:44 pm

Web Title: ind vs nz 4th t20i manish pandey slams a half century gives his best performance on no 6 psd 91
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 Ind vs NZ : …आणि मैदानावर झळकलं We Miss You Dhoni चं पोस्टर
2 Ind vs Eng Women’s T20I : भारताचा विजय, ५ विकेट राखून जिंकला सामना
3 Video: आपण बाद झालोय यावर भारतीय फलंदाजाचा विश्वासच बसेना
Just Now!
X