आफ्रिकेच्या अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना दिलेल्या कडव्या झुंजीमुळे पहिला कसोटी सामना अनिर्णित अवस्थेकडे झुकण्याची शक्यता तयार झाली आहे. भारतीय संघाच्या ५०२ धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांमध्ये आटोपला. भारताने पहिल्या डाव्यात ७१ धावांची आघाडी घेतली. रविचंद्रन आश्विनने पहिल्या डावात सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना आफ्रिकेच्या ७ फलंदाजांना माघारी धाडलं.

या कामगिरीदरम्यान आश्विनने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले आहेत. भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ६ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आश्विनने दुसरं स्थान पटकावलं आहे.

कसोटीत सर्वाधिकवेळा ६ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारे गोलंदाज –

  • अनिल कुंबळे – १९ वेळा
  • रविचंद्रन आश्विन – १४ वेळा
  • हरभजन सिंह – १३ वेळा

पहिल्या डावात रविंद्र जाडेजाने २ तर इशांत शर्माने १ बळी घेत आश्विनला चांगली साथ दिली.

अवश्य वाचा – Ind vs SA : दिग्गजांना मागे टाकत ‘सर जाडेजा’ ठरले सरस