मोहालीच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला १४१ धावांनी पराभूत करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने श्रीलंकेसमोर ३९३ धावांचे आव्हान ठेवले होते. डोंगरा एवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाला निर्धारित ५० षटकात ८ बाद २५१ धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने हा सामना १४१ धावांनी जिंकला असून, तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली आहे. अँजेलो मॅथ्यूजच्या नाबाद १११ धावांची खेळी वगळता एकाही श्रीलंकन फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

भारताने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. श्रीलंकेची सलामीवीर उपुल थरंगा अवघ्या ७ धावावर बाद झाला. हार्दिक पांड्याने भाराताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर बुमराहने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. त्याने दनुष्का गुणतिलकाला १४ धावावर बाद केले. अँजेलो मॅथ्यूज आणि लाहिरू थिरिमाने यांनी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र थिरमाने रिव्हरशीप फटका खेळण्याच्या नादात आपली विकेट फेकली. वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला. त्याने २५ चेंडूत २१ धावा केल्या. त्यानंतर चहलने डिक्वेलाला  वॉशिंग्टनकरवी झेलबाद केले. मॅथ्यूजने कारकिर्दीतील ३६ अर्धशतक झळकावले. मात्र, त्याच्याशिवाय एकही फलंदाज मैदानावर तग धरताना दिसत नाही. कर्णधार थिसारा परेरानंतर सचिथ पथिराणा (२) आणि अकिला धनंजया (११) तंबूत परतले. युदवेंद्र चहलने सर्वाधिक तीन बळी मिळवले. बुमराहने दोघांना तंबूचा रस्ता दाखवला. तर भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

भारतीय सलामीवीर रोहित शर्माचे नाबाद द्विशतक आणि त्याला श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने दिलेली साथ याच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर ३९३ धावांचे आव्हान ठेवले. रोहित शर्माचे वनडेतील तिसरे द्विशतक झळकावले. त्याने १५३ चेंडूत १३ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीने नाबाद २०८ धावांची खेळी केली. तर या सामन्यात  शिखर धवनने  एकदिवसीय सामन्यातील २३ वे अर्धशतक साजरे केले. त्याने ९ चौकाराच्या मदतीने ६७ चेंडुत ६८ धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरने ८८ धावांची दमदार खेळी केली. रोहितच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकात ४ बाद ३९२ धावा केल्या. अखेरच्या षटकात मैदानात आलेल्या धोनीने ७ आणि पांड्याने ८ धावांचे योगदान दिले.

श्रीलंकेकडून कर्णधार थिसारा परेराने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर सचिथ पथिराणानेला एक बळी मिळवता आला. श्रीलंकेचा कर्णधार थिसारा परेराने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या एकदिवसीय सामन्यात देखील परेरानेच नाणेफेक जिंकली होती. पहिल्या सामन्यातील विजयानंतर श्रीलंकेला मालिका जिंकण्याची संधी आहे. तर मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा सामना जिंकणे महत्त्वाचे आहे.

  • मॅथ्यूजचे झुंजार शतक व्यर्थ
सामन्यादरम्यान मॅथ्यूज मैदानात कोसळला (बीसीसीआय)
  • श्रीलंकेला अाठवा धक्का, अकिला धनंजयाला बुमराहने दाखवला तंबूचा रस्ता
  • भुवनेश्वरची सामन्यातील पहिली विकेट
  • सचिथ पथिराणाच्या रुपात श्रीलंकेला सातवा धक्का
  • कर्णधार थिसारा परेरा अवघ्या पाच धाववार बाद, श्रीलंकेला सहावा धक्का
  • श्रीलंकेला पाचवा धक्का, डिक्वेला चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद
  •  मॅथ्यूजने झळकावले कारकिर्दीतील ३६ वे अर्धशतक
  • डिक्वेलाच्या रुपात श्रीलंकेला चौथा धक्का
  • थिरमाने ठरला वॉशिंग्टनच्या वनडे कारकिर्दीतील पहिला बळी
  •  वॉशिंग्टनच्या ‘सुंदर’ चेंडूवर थिरमाने ‘क्वीन बोल्ड’
  • बुमराहने श्रीलंकेला दुसरा धक्का दिला, त्याने दनुष्का गुणतिलकाला बाद केले
  • उपुल थरंगा अवघ्या ७ धावावर तंबूत परतला
  • हार्दिक पांड्यानं श्रीलंकेला दिला पहिला धक्का
  •  उपुल थरंगा आणि दनुष्का गुणतिलका श्रीलंकेच्या डावाला सुरुवात केली
  • भारतीय संघाने निर्धारित ५० षटकाक ४ बाद ३९२ धावा केल्या

  • मोहालीच्या मैदानात रोहिची कमाल नाबाद
  • श्रेयस अय्यरची ८८ धावांची दमदार खेळी
  • षटकाराने साजरे केले दिड शतक

  • सुरंगाच्या षटकात चार षटकार
  • ४४ व्या षटकात रोहितची तुफान फटकेबाजी
  • कर्णधार रोहित शर्माने साजरे केल शतक

  • मोहालीच्या मैदानात श्रेयसने साजरे केले वनडेतील पहिले अर्धशतक
  • १०१ चेंडुत १०५ धावांची भागीदारी
  • कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर लयीत
  • भारतीय संघाने २०० धावांचा टप्पा ओलांडला
  • रोहितने साजरे केले ३५ वे अर्धशतक
  • सचिथ पथिराणाच्या गोलंदाजीवर लाहिरू थिरिमाने याने उत्तम झेल टिपला
  • भारताची सलामीची जोडी फोडण्यात श्रीलंकेला यश, धवन झेलबाद
  • शिखर धवन-रोहित शर्मा जोडी जमली, १२२ चेंडूत १०९ धावांची भागीदारी
  • भारताने शंभर धावांचा टप्पा ओलांडला

  • शिखर धवनने कारकिर्दीतील २३ वे अर्धशतक साजरे केले
  • भारताने १२.१ षटकात संघाच्या ५० धावापूर्ण केल्या
  • पहिल्या ९ षटाकात भारताने चारपेक्षाही कमी सरासरीनं धावा केल्या आहेत
  • चौथ्या षटकात सुरंगा लकमलच्या गोलंदाजीवर रोहित शर्माचा  खणखणीत चौकार
  • मॅथ्यूजच्या गोलंदाजीवर दोन्ही सलामीवीरांचा सावध पवित्रा
  • शिखर धवनने मारला पहिला चौकार
  • सुरंगा लकमलच्या गोलंदांजीवर एका चौकाराच्या मदतीनं ६ धावा
  • अँजेलो मॅथ्यूजनं पहिले षटक निर्धाव टाकले
  • कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनने डावाला सुरुवात केली

  • वॉशिंग्टन सुंदर हा मोहालीच्या मैदानातून आपल्या वनडे कारकिर्दीला सुरुवात करतोय