News Flash

जे कोणालाही जमलं नाही ते गेलने करुन दाखवलं ! भारताविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद

ब्रायन लाराचा विक्रम गेलने मोडला

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने वन-डे क्रिकेटच्या इतिहासात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. पोर्ट ऑफ स्पेनच्या मैदानावर भारताविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ख्रिस गेलचा ३०० वा वन-डे सामना ठरला आहे. याआधी कोणत्याही वेस्ट इंडिजच्या खेळाडूला अशी कामगिरी जमलेली नाहीये. माजी विंडीज कर्णधार ब्रायन लाराने २९९ वन-डे सामने खेळले आहेत. त्यामुळे ३०० वन-डे सामने खेळणारा गेल पहिला विंडीज फलंदाज ठरला आहे.

भारताविरुद्धची वन-डे मालिका गेलची अखेरची मालिका असणार आहे. भारताविरुद्ध मालिकेसाठी गेलने आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. त्यामुळे या मालिकेत ख्रिस गेल आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची अखेर कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 7:49 pm

Web Title: ind vs wi chris gayle becomes first batsman to play 300 odi beat brain lara record psd 91
Next Stories
1 माजी पाकिस्तानी खेळाडूला विराटचा धोबीपछाड, मानाच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान
2 Video : लेट आलोय पण थेट आलोय ! विराट कोहलीने पूर्ण केलं #BottleCapChallenge
3 Ind vs WI 2nd ODI : भारताची वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात
Just Now!
X