News Flash

Boys Day Out… हार्दिकनं शेअर केला विराट, राहूलसोबतचा कॅनबेरामधील खास फोटो

नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-२ अशी हार पत्करली

India tour of australia 2020 : आयपीएलमध्ये नुकतीच ट्वेन्टी-२० क्रिकेटची मजा लुटल्यानंतर आता भारत-ऑस्ट्रेलिया या बलाढय़ संघांमधील ट्वेन्टी-२० क्रिकेटचे मनोरंजन क्रिकेटरसिकांना अनुभवत आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये जाणवलेली पर्यायांची कमतरता ही अडचण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारतापुढे नक्कीच नाही. त्यामुळेच तीन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेतील शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियापुढे कडव्या आव्हानाची अपेक्षा आहे. पहिल्या टी-२० सामन्यापूर्ही कर्णधार विराट कोहली सहकाऱ्यासोबत कॅनबेरामध्ये बाहेर पडला आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्यानं कॅनबेरामधील एका कॅफेमधील सेल्फी आपल्या सोशल मीडियावर टाकला आहे.

हार्दिक पांड्यानं पोस्ट केलेल्या सेल्फीमध्ये कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार के. एल राहुल, मयांक अग्रवाल आणि मयांकची पत्नी आशिता सूद दिसत आहेत. शुक्रावारी सांयकाळी (ऑस्ट्रेलियनं वेळेनुसार) होणाऱ्या सामन्यापूर्वी सकाळी भारतीय संघातील खेळाडू आऊटींगसाठी निघाले. हार्दिक पांड्यानं सेल्फी पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘Out and about beautiful sunny Canberra’ असं लिहिलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने १-२ अशी हार पत्करली होती. यातून बरेच धडे घेता येण्याजोगे असले तरी ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडे समतोल संघ असल्यामुळे ही लढत अधिक रंगतदार होईल. टी-२० मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये बॉर्डर-गावसकर मालिका होणार आहे. यामध्ये चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 10:34 am

Web Title: india in australia hardik pandya virat kohli kl rahul and mayank agarwal out and about in sunny canberra nck 90
Next Stories
1 मैदानात न उतरताही रोहित शर्मानं केला विक्रम
2 भारत-ऑस्ट्रेलिया ट्वेन्टी-२० मालिका : ऑस्ट्रेलियापुढे कडवे आव्हान
3 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रोनाल्डोचा ७५०वा गोल!
Just Now!
X