News Flash

भारताचा बेल्जियमकडून पराभव

भारताच्या पुरुष हॉकी संघाला एफ आयएच जागतिक लीग उपांत्य फेरीपूर्वीच्या दुसऱ्या सराव सामन्यात यजमान बेल्जियमविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला.

| June 15, 2015 01:25 am

भारताच्या पुरुष हॉकी संघाला एफ आयएच जागतिक लीग उपांत्य फेरीपूर्वीच्या दुसऱ्या सराव सामन्यात यजमान बेल्जियमविरुद्ध १-२ असा पराभव पत्करावा लागला. या स्पध्रेला शनिवारपासून सुरुवात होत आहे.
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने १२व्या मिनिटाला पहिला गोल करून खाते उघडले, मात्र ३२व्या मिनिटाला आकाशदीप सिंगने मैदानी गोल करून सामना १-१ असा बरोबरीत आणला. या बरोबरीनंतर भारताने अधिक काळ चेंडूचा ताबा स्वत:कडे ठेवताना यजमानांवर दडपण निर्माण केले. ५२व्या मिनिटाला बेल्जियमने ही कोंडी फोडली आणि विजयी आघाडी घेतली. २-१ अशी आघाडी कायम राखत बेल्जियमने हा सामना जिंकला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2015 1:25 am

Web Title: india lose to belgium in practice match
Next Stories
1 बोपन्ना-मर्गीआ जोडीला जेतेपद
2 शास्त्री यांच्या भवितव्याचा निर्णय पुढील बैठकीत
3 भारत-बांग्लादेश कसोटी सामना अनिर्णित
Just Now!
X