18 January 2019

News Flash

भारताच्या सिंहासनाला धोका नाही

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतरही अव्वल स्थान कायम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतरही अव्वल स्थान कायम

मायभूमीत कसोटी मालिकेत एकामागोमाग अनेक संघांना धूळ चारणाऱ्या भारतीय संघाची खरी कसोटी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर लागणार आहे. या कसोटीत भारताच्या कामगिरीकडे सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान अबाधित राहील की नाही, याची उत्सुकता आहे. पण भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला सपाटून मार खावा लागला तरी त्यांचे कसोटीतील अव्वल स्थान कायम राहणार आहे. मात्र यजमान आफ्रिका संयुक्तपणे अव्वल स्थानावर झेप घेणार आहे.

फॅफ डय़ू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ १३ गुणांच्या पिछाडीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

भारतीय संघ १२४ गुणांनी अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे या मालिकेत आफ्रिकेने तिन्ही सामने जिंकल्यास दोन्ही संघ प्रत्येकी ११८ गुणांसह अव्वल स्थानावर संयुक्तपणे विराजमान होतील. गुरुवारपासून या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकल्यास त्यांची एकूण गुणसंख्या १२८ होईल, तर दक्षिण आफ्रिकेची १०७ होईल. दरम्यान, अ‍ॅशेस कसोटी मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर झेप घेईल. परंतु अखेरची कसोटी जिंकून अव्वल पाच संघांमध्ये राहण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे.

First Published on January 4, 2018 2:42 am

Web Title: india rank 1 in icc test cricket rankings