26 February 2021

News Flash

पाकिस्तानला नमवून भारत अंतिम फेरीत

जेतेपदासाठी इराणचे कडवे आव्हान

| May 26, 2016 03:24 am

जेतेपदासाठी इराणचे कडवे आव्हान
आशियाई स्नूकर सांघिक अजिंक्यपद स्पध्रेच्या उपांत्य फेरीत भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ३-० असे सहज नमवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. सुवर्णपदकाच्या लढतीत भारतासमोर इराणचे कडवे आव्हान असणार आहे.
आशियाई ६-रेड स्नूकर अजिंक्यपद स्पध्रेत नुकतेच वैयक्तिक जेतेपद पटकावणाऱ्या पंकज अडवाणी आणि कांस्यपदक विजेता आदित्य मेहता यांनी भारताचा विजय साकारला.
आदित्य मेहताने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफचा ७३-१६ असा पराभव करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यात पंकजने अस्जाद इक्बालचा ८३-२५ असा धुव्वा उडवत भर घातली. दुहेरीत पंकज आणि आदित्य या जोडीने आसिफ व इक्बालवर ९२-८ असा दणदणीत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या उपांत्य फेरीत इराणने ३-० अशा फरकाने मलेशियाचे आव्हान सहज परतवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 3:24 am

Web Title: india thump pakistan to enter asian snooker championship final
टॅग : Pankaj Advani
Next Stories
1 पश्चिम विभागीय स्पध्रेसाठी हृषीकेश, दीक्षाकडे महाराष्ट्राचे नेतृत्व
2 अंतिम फेरीत पोहोचण्याचा आनंद निराळाच – डी’व्हिलियर्स
3 हैदराबादचा दिमाखदार विजय
Just Now!
X