आयपीएलचा तेरावा हंगाम पार पडल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. २७ नोव्हेंबरपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. Outlook ने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडिया या दौऱ्यावर वन-डे आणि टी-२० मालिका रेट्रो जर्सीमध्ये खेळणार आहे.

अवश्य पाहा – टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज

टीम इंडियाच्या सध्याच्या जर्सीचा रंग हा निळा आहे. पण ७० ते ८० च्या दशकात टीम इंडियाची गाजलेली रेट्रो जर्सी चाहत्यांना पुन्हा मैदानात पहायला मिळणार आहे. या नव्या जर्सीवर टीम इंडियाचा नवीन किट स्पॉन्सर MPL (Mobile Premier League) चा लोगो आहे. काही दिवसांपूर्वीच BCCI ने टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरचे हक्क MPL ला दिले आहेत. भारतीय संघाप्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा संघही या दौऱ्यावर खास डिजाईन केलेली जर्सी घालून मैदानात उतरणार आहे.

असा आहे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा कार्यक्रम –

पहिला वन-डे सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वन-डे सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वन-डे सामना – १ डिसेंबर – मनुका ओव्हल
————————————————-
पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – मनुका ओव्हल
दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
————————————————–
पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अ‍ॅडलेड (दिवस-रात्र)
दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गॅबा