सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या भारतीय पुरूष हॉकी संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात ३-१ ने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडवर दणदणीत विजय साजरा केल्यानंतर गतविजेत्या ऑस्ट्रेलियालाही भारत कडवी झुंज देईल अशी अपेक्षा होती. पण या सामन्यात भारताकडून लौकिकाला साजेशी कामगिरी झाली नाही. सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरीची नोंद करून भारतावर विजयी आघाडी घेतली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त केले आहे.
स्पर्धेत भारताची सुरूवात चांगली झाली होती. पहिल्या लढतीत २-० अशा आघाडीनंतरही बचावफळीतील शिथिलतेमुळे भारतीय संघाला इंग्लंडने २-२ असे रोखण्यात यश मिळवले, परंतु चुकांमधून धडा घेत भारताने दुसऱ्या लढतीत न्यूझीलंडला ३-० असे नमवण्याची किमया केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 2, 2017 6:55 pm