News Flash

cricket world cup 2019 : आकडेपट : हीरकमहोत्सवी विजयाचे लक्ष्य

विंडीजने भारताविरुद्ध विश्वचषकामधील अखेरचा विजय २७ वर्षांपूर्वी १९९२मध्ये मिळवला होता.

दीपक जोशी

१९७९पासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात विश्वचषकाच्या आठ लढती झाल्या आहेत. यापैकी भारताने पाच आणि वेस्ट इंडिजने तीन लढती जिंकल्या आहेत. भारताच्या विजयांमध्ये १९८३च्या विश्वविजेतेपदाचा समावेश आहे. विंडीजने भारताविरुद्ध विश्वचषकामधील अखेरचा विजय २७ वर्षांपूर्वी १९९२मध्ये मिळवला होता. त्यानंतर १९९६, २०११, २०१५ असे तीन सलग सामने भारताने जिंकले आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या १२७ एकदिवसीय सामन्यांपैकी भारतीय संघ गुरुवारी हीरक महोत्सवी विजय साकारण्यासाठी उत्सुक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 4:04 am

Web Title: indian cricket team track record against against west indies in cricket world cup zws 70
Next Stories
1 cricket world cup 2019  चर्चा तर होणारच.. : विश्वचषकातील सर्वोत्तम चेंडू?
2 Cricket World Cup 2019 : अर्वाच्य भाषेतील टीकेमुळे व्यथित!
3 Cricket World Cup 2019 : जेसन रॉय भारताविरुद्ध खेळणार?
Just Now!
X