इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) दुसऱ्या सत्राला ३ ऑक्टोबरला सुरुवात होणार असून पहिला सामना गतविजेत्या अ‍ॅटलेटिको दी कोलकाता (एटीके) विरुद्ध यजमान चेन्नईयन एफसी यांच्यात होणार असल्याची घोषणा शुक्रवारी आयोजकांनी केली. पहिल्या सामन्याच्या यजमानपदाचा मान चेन्नईला मिळाला आहे.
या स्पध्रेत ६१ सामने खेळविण्यात येणार असून
२० डिसेंबरला अंतिम लढत होणार आहे. गतवर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेला केरला ब्लास्टर एफसी संघ पहिल्या लढतीत घरच्या मैदानावर बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमच्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसी संघाशी सामना करील. मुंबई सिटी एफसी आपला पहिला सामना पुणे सिटी एफसी संघाविरुद्ध ५ ऑक्टोबरला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळेल.