19 September 2020

News Flash

दूरचित्रवाणीवरही इंडियन सुपर लीग हिट!

भारतीय फुटबॉलमध्ये नवा अध्याय लिहणाऱ्या इंडियन सुपर लीगला (आयएसएल) फक्त स्टेडियममध्येच नव्हे तर दूरचित्रवाणीवरही चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

| November 1, 2014 04:04 am

भारतीय फुटबॉलमध्ये नवा अध्याय लिहणाऱ्या इंडियन सुपर लीगला (आयएसएल) फक्त स्टेडियममध्येच नव्हे तर दूरचित्रवाणीवरही चाहत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. एका आठवडय़ाभरात जगभरातील एक कोटी ७० लाख चाहत्यांनी दूरचित्रवाणीवरून आयएसएलचे सामने पाहिले असून भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील हा मैलाचा दगड ठरला आहे. विशेष म्हणजे, फिफा विश्वचषक स्पर्धेपेक्षाही भारतातील चाहत्यांनी आयएसएलला पसंती दिली आहे.
उद्घाटनाच्या दिवशी आयएसएलला दूरचित्रवाणीवरून तब्बल सात कोटी ४७ लाख चाहत्यांचा प्रतिसाद लाभला होता. फिफा विश्वचषकाला पहिल्या दिवशी भारतातून मिळालेल्या १२ पट जास्त प्रतिसाद आयएसएलला पहिल्या दिवशी मिळाला होता.
तब्बल आठ वाहिन्यांवरून आयएसएलच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. इंटरनेटवरही आयएसएलला तूफान प्रतिसाद मिळाल्याचे आकडेवारी सांगते. पहिल्या दोन दिवसांत तब्बल आठ लाख चाहत्यांनी या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीच्या संकेतस्थळाला भेट दिली होती.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 4:04 am

Web Title: indian super league hit
Next Stories
1 श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात वृद्धिमन साहाला संधी
2 मुरलीला कधीच खेळता आले नसते -युसूफ
3 प्रशिक्षक बदलल्यानंतर कामगिरीत सुधारणा
Just Now!
X