News Flash

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा

भारतीय महिला क्रिकेट निवड समितीने संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.

(संग्रहित छायाचित्र)

न्यूझीलंडविरुद्ध मिताली राजच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या एकदिवसीय मालिकेतील भारतीय महिलांचा संघच इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी कायम ठेवण्यात आला आहे.

भारतीय महिला क्रिकेट निवड समितीने संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेस मुंबईत २२ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा महिलांचा सामना होणार आहे. भारतीय महिलांनी न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली होती.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारताच्या अध्यक्षीय एकादश संघाचीदेखील घोषणा केली. हा सराव सामना १८ फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे.

भारतीय महिलांचा संघ

मिताली राज (कर्णधार), झुलन गोस्वामी, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, दीप्ती  शर्मा, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), आर. कल्पना, मोना मेश्राम, एकता बिश्त, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, शिखा पांडे, मानसी जोशी, पूनम राऊत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 1:27 am

Web Title: indian womens team announced for the series against england
Next Stories
1 IND v NZ : भारताच्या विजयात कृणाल पांड्याचं मोलाचं योगदान, केला अनोखा विक्रम
2 Video: DJ Bravo च्या नवीन गाण्यात धोनी-कोहलीचा जयजयकार
3 रणजी करंडक विजेता विदर्भ संघ ठरला करोडपती
Just Now!
X