News Flash

Indonesia Open : वाढदिवशी सिंधूचे चाहत्यांना ‘रिटर्न गिफ्ट’; उपांत्यपूर्व फेरीत धडक

जपानच्या ओहोरीवर २१-१७, २१-१४ अशी सहज मात

Indonesia Open : वाढदिवशी सिंधूचे चाहत्यांना ‘रिटर्न गिफ्ट’; उपांत्यपूर्व फेरीत धडक
पी. व्ही. सिंधू (संग्रहीत छायाचित्र)

Indonesia Open : जकार्ता येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधूने विजयी लय कायम राखत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायन नेहवालचा या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभव झाला. त्यामुळे भारतीय बॅडमिंटन प्रेमी नाराज होते. मात्र वाढदिवशी विजय साजरा करून सिंधूने आपल्या चाहत्यांना ‘रिटर्न गिफ्ट’ दिले.

आज दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत जपानच्या अया ओहोरी हिच्याशी होती. सिंधूला या स्पर्धेत तिसरे मानांकन देण्यात आले असून तिचा सलामीचा सामना बिगरमानांकित चोचुवाँगशी होता. तो सामना जिंकल्यामुळे हा सामना तिच्यासाठी तुलनेने सोपा होता. पहिल्याच गेममध्ये सिंधूने चांगली सुरुवात केली. आणि गेम २१-१७ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये सामना अटीतटीचा होईल, अशी प्रेक्षकांना अपेक्षा होती. पण या गेममध्येही सिंधूने आपले वर्चस्व राखले. हा गेम सिंधूने २१-१४ असा जिंकला. त्यामुले सामना तिसऱ्या गेमपर्यंत खेळावंच लागला नाही. केवळ ३६ मिनिटात सिंधूने सामना जिंकत स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पुढील फेरीत तिचा सामना चीनच्या हे बिन्गजिओ हिच्याशी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 6:42 pm

Web Title: indonesia open pv sindhu japan ohori birthday girl
Next Stories
1 …तर भारतीय गोलंदाज इंग्लंडमध्ये प्रभावी ठरतील – राहुल द्रविड
2 गोपीचंद यांनी कन्येसाठी मला संघातून डावललं; बॅडमिंटनपटू अपर्णा बालनचा गंभीर आरोप
3 Indonesia Open : सायना स्पर्धेबाहेर; चीनच्या युफेईकडून सरळ गेममध्ये पराभूत
Just Now!
X