भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल हिचा आज २७ वा वाढदिवस आहे. बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त करणारी सायना नेहवाल पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. याशिवाय ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणारी ती पहिली भारतीय बॅडटमिंटनपटू ठरली होती. नेहवालच्या नावावर अनेक बॅडमिंटन स्पर्धांची जेतेपदं जमा आहेत. सायना नेहवालच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच देशात बॅडमिंटनचे महत्त्व आणि लोकप्रियतेत वाढ झाली. बॅडमिंटनमधून देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन गेलेल्या अशा या ‘फुलराणी’ने आज २७ वा वाढदिवस साजरा केला. सायनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दलच्या खास गोष्टी..

१. बॅटमिंटनमध्ये करिअर करण्याआधी सायना कराटे चॅम्पियन होती. तिच्याकडे कराटेचा ब्राऊनबेल्ट आहे.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत

२. कॉमनवेल्थ स्पर्धेत सायनाने चार पदकं कमावली आहेत. यात एक सुवर्ण तर तीन कांस्य पदकांचा समावेश आहे.

३. सायनाचे वडील हरविर सिंग आणि आई उशा नेहवाल हे दोघंही राज्य बॅडमिंटनचे विजेते राहिले आहेत.

४. सायनाच्या खात्यात तब्बल २१ आंतरराष्ट्रीय विजेतेपदं जमा आहेत.

 

५. प्रत्येक सामना जिंकल्यानंतर सायना तिचं आवडतं आईस्क्रिम खाऊन सेलिब्रेशन करते.

६. करिअरच्या एका काळात सायना जगातील सर्वात महागडी बॅडमिंटन खेळाडू होती.

७. सायनाच्या सराव शिबिरांसाठी तिच्या वडीलांना कर्ज घ्यावे लागले होते. सायनाने याची जाणीव ठेवून वडीलांच्या सर्व आशा पूर्ण केल्या.

८. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद दोनवेळा जिंकणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे.