चेसमेन रत्नागिरी आणि के.जी.एन. सरस्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणारी रामचंद्र सप्रे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा या वर्षी करोनाच्या साथीमुळे ऑनलाइन पद्धतीने ११ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष असून Lichess.org संकेतस्थळावर ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनानुसार एकूण तीन गटांत घेण्यात येणार आहे. यंदा स्पर्धकांना विनाशुल्क  स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

आंतरराष्ट्रीय गुणांकन २००० व त्यापेक्षा जास्त असलेले  खेळाडू पहिल्या गटात (अ), आंतरराष्ट्रीय गुणांकन २०००च्या खाली असलेले दुसऱ्या (ब), तर १५०० गुणांकनाखालील खेळाडू तिसऱ्या गटामध्ये (क) सहभागी होऊ शकतात, अशी माहिती चैतन्य भिडे यांनी दिली. क-गटाची स्पर्धा ११ डिसेंबरपासून, ब-गटाची स्पर्धा १८ डिसेंबरपासून आणि अ-गटाची स्पर्धा २४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. रत्नागिरीच्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून खास जिल्हास्तरीय बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.