आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. २९ मार्चला गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. या हंगामासाठी सर्व संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. आयपीएलनेही या हंगामासाठी आपली पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

महत्वाची गोष्ट म्हणजे या जाहिरातीत महेंद्रसिंह धोनीसह सर्व कर्णधारांची खिल्ली उडवण्यात आलेली आहे. पाहा आयपीएलची ही जाहीरात…

Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Liquor Licenses pune
पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद
mumbai passengers marathi news, local train marathi news
सुट्टीकालीन लोकल वेळापत्रकाने प्रवासी हैराण, गुड फ्रायडेच्या दिवशी लोकलचा खोळंबा

१ मार्चपासून धोनी सरावासाठी मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दुरावलेला आहे. एकीकडे धोनी निवृत्ती कधी स्विकारणार या चर्चांना उधाण आलेलं असतानाही त्याला आगामी टी-२० विश्वचषकात संधी मिळावी अशी चाहत्यांची मागणी आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी धोनीचं भारतीय संघातलं पुनरागमन हे आयपीएल हंगामावर अवलंबून असेल असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आगामी काळात धोनी आयपीएलमध्ये कसा खेळ करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : तो परत आलाय ! चेन्नई सुपरकिंग्जने पोस्ट केला धोनीचा फोटो