News Flash

IPL 2021: केकेआरचा कर्णधार ईऑन मॉर्गनला दंड

मॉर्गनकडून आयपीएल नियमांचं उल्लंघन

सौजन्य- iplt20.com

कोलकाता नाइट राइडर्सचा कर्णधार ईऑन मॉर्गनला दंड ठोठावण्यात आला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात धीम्या गतीने गोलंदाजी केल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.

कोलकाता संघाने नाणेफेक जिंकत चेन्नईला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मात्र हा निर्णय कोलकात्याला चांगलाच महाग पडला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत ३ गडी गमवत २२० धावा केल्या होत्या. मात्र कोलकात्याचा संघ १९.१ षटकात सर्वबाद २०२ धावा करु शकला. चेन्नईने कोलकात्याला १८ धावांनी पराभूत केलं. कोलकात्याचा या स्पर्धेतील सलग तिसरा पराभव आहे. फाफ डु फ्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडने आक्रमक फलंदाजी करत कोलकात्याच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. प्रत्युत्तरात कोलकाताने पहिल्या पॉवरप्लेमध्ये आपले अर्धे फलंदाज गमावले, त्यानंतर आंद्रे रसेल, दिनेश कार्तिक आणि पॅट कमिन्सने वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. कोलकाताचा डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. चेन्नईचा सलामीवीर फाफ डु प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

IPL 2021: बंगळुरुची विराटसेना विजयी चौकार लगावणार?

कोलकात्याचा कर्णधार ईऑन मॉर्गननं या स्पर्धेतील ही पहिली चूक केली आहे. त्यामुळे आयपीएल नियमावलीनुसार त्याला १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. ही चूक त्याने पुन्हा केली तर मात्र त्याला २४ लाखांचा दंड भरावा लागेल. तर संघातील ११ खेळाडुंना सामना फिमधून २५ टक्के रक्कम किंवा ६ लाख रुपये द्यावे लागतील. जर तिसऱ्यांदा पुन्हा तशीच चूक केल्यास ३० लाखांचा दंड किंवा एक सामन्यासाठी बंदी येऊ शकते. तर संघातील ११ खेळाडुंना १२ लाख रुपये किंवा सामना फिमधून ५० टक्के रक्कम कापली जाईल.

IPL 2021 : चेन्नईच्या मराठमोळ्या फलंदाजाचे अर्धशतक, पण चर्चा होतेय धोनीची

कोलकात्याचा पुढचा सामना २४ एप्रिलला राजस्थान रॉयल्ससोबत आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता मुंबईतील वानखेडे मैदानात रंगणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 2:57 pm

Web Title: ipl 2021 kkr captain eion morgan fined for slow over rate against csk rmt 84
टॅग : IPL 2021,Kkr
Next Stories
1 IPL 2021: बंगळुरुची विराटसेना विजयी चौकार लगावणार?
2 बेंगळूरुचा विजयरथ राजस्थान रोखणार?
3 CSK vs KKR : वानखेडेवर चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक!
Just Now!
X