scorecardresearch

IPL 2021: बंगळुरुची विराटसेना विजयी चौकार लगावणार?

कोण मारणार बाजी?

IPL 2021: बंगळुरुची विराटसेना विजयी चौकार लगावणार?

आयपीएल २०२१ स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना रंगणार आहे. बंगळुरुची या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात झाली आहे. बंगळुरुने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. त्यामुळे या सामन्यात राजस्थानला पराभूत करून विजयी चौकार लावण्यासाठी विराटसेना सज्ज झाली आहे. राजस्थान विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी येण्याचं बंगळुरुचं लक्ष्य आहे. तर राजस्थानचा संघ तीन पैकी एका सामन्यातच विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचं संघावर दडपण असणार आहे.

बंगळुरुने पहिल्या सामन्यात मुंबईला, दूसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केलं आहे. सलग तीन विजय मिळवल्याने बंगळुरु संघात कोणताही बदल दिसणार नाही. बंगळुरुचे ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स चांगलेच फॉर्मात आहेत. मॅक्सवेलच्या तुफान खेळीमुळे मधल्या फळीची फलंदाजी मजबूत स्थितीत आहे. तर आघाडीचे फलंदाज कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल चांगले प्रदर्शन करु शकले नाहीत. विराटने काही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली. मात्र मोठी धावसंख्या उभारण्यास अयशस्वी ठरला आहे. तर देवदत्त पडिक्कलही आतापर्यंत आपली छाप पाडू शकला नाही. दूसरीकडे गोलंदाजीत हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज चांगली कामगिरी करत आहेत. तर फिरकीपटू शाहबाज अहमदच्या फिरकीची जादू चालत आहे.

IPL 2021 : चेन्नईच्या मराठमोळ्या फलंदाजाचे अर्धशतक, पण चर्चा होतेय धोनीची

राजस्थान रॉयल्सची या स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तीन पैकी एक सामना जिंकण्यात राजस्थानला यश मिळालं आहे. चेन्नईकडून पराभवाची चव चाखल्यानंतर राजस्थानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाबविरुद्ध कर्णधार सॅमसननं शतकी खेळी केली मात्र विजय मिळवू शकला नाही. दिल्लीविरुद्ध डेविड मिलर आणि ख्रिस मॉरिस यांच्या जोरावर संघानं विजय मिळवला होता. चेन्नई विरुद्धही राजस्थानचे गोलंदाज चालले नाहीत. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास चेन्नईला मदत झाली. त्यामुळे बंगळुरुविरुद्धचा सामना जिंकण्याचं दडपण संघावर असणार आहे.

CSK vs KKR : वानखेडेवर चेन्नईच्या विजयाची हॅट्ट्रिक!

आयपीएल कारकिर्दीत बंगळुरु आणि राजस्थान हे दोन संघ २२ वेळा आमनेसामने आले आहेत. दोघांनी १०-१० सामने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ बंगळुरुची विजयी घोडदौड थांबवणार का? याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

बंगळुरु- विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज. केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जोशुआ फिलिप, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अॅडम जाम्पा, कायल जेमिसन, रजत पाटिदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डेन ख्रिश्चन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनिअल सॅम्स आणि हर्षल पटेल

राजस्थान- संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाळ, मयंक मार्कंडेय, अँड्र्यु टाय, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, कुलदीप यादव आणि आकाश सिंह

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ ( Ipl2021 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या