27 February 2021

News Flash

IPL 2021: CSKने ‘या’ सहा खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा यादी

रैना, ब्राव्हो, ताहिरला दिलं संघात स्थान

IPL 2020 मध्ये मुंबईच्या संघाने पाचवं विजेतेपद मिळवलं. पण सर्वाधिक चर्चा झाली ती चेन्नई संघाच्या अपयशी हंगामाची. IPL सुरू झाल्यापासून प्रथमच चेन्नईचा संघ प्ले-ऑफ्समध्येही पोहोचू शकला नाही. चेन्नईवर काही लोकांनी टीका केली. तर काही त्यांच्या पाठीशी ठामपण उभे राहिले. या साऱ्या गोंधळात IPL 2021साठी चेन्नईचा संघ कोणत्या खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार याबाबत चर्चा सुरू होती. त्या चर्चेवर पडदा पडला. चेन्नईने पियुष चावला, हरभजन सिंग अशा अनुभवी खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवला तर धोनीसह रैना, ब्राव्हे, जाडेजा यांना संघात कायम राखलं. पाहा संघात कायम राखलेल्या आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी…

कायम राखलेले खेळाडू-

महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहिर, एन जगदीसन, कर्ण शर्मा, लुंगी एनगीडी, मिचेल सँटनर, रवींद्र जाडेजा, ऋतूराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, सॅम करण, जोश हेजलवूड, आर साई किशोर

करारमुक्त केलेले खेळाडू-

केदार जाधव, मुरली विजय, हरभजन सिंग, पियुष चावला, मोनू सिंग, शेन वॉटसन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 1:30 pm

Web Title: ipl 2021 retention csk full list of players retained and released ms dhoni raina harbhajan piyush chawla shardul thakur bravo vjb 91
Next Stories
1 “मला माझं नाव…,” धोनीसोबत होणाऱ्या तुलनेवर अखेर ऋषभ पंतने दिली प्रतिक्रिया
2 Video: एकदम दणकाच… ऑस्ट्रेलियाला नमवणाऱ्या अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत
3 IPL 2021: SRHने संघात कायम राखले तब्बल २२ खेळाडू, पाहा यादी
Just Now!
X