27 May 2020

News Flash

आयपीएलच्या सहाव्या पर्वाला ३ एप्रिलपासून प्रारंभ

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाला ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर पुढील वर्षी ३ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. घरच्या मैदानावर गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ दिल्ली डेअरडेव्हिल्सशी सलामीची

| December 22, 2012 04:59 am

इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या पर्वाला ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर पुढील वर्षी ३ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. घरच्या मैदानावर गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ दिल्ली डेअरडेव्हिल्सशी सलामीची लढत खेळणार आहे.
आठ आठवडे नऊ संघांमध्ये होणाऱ्या यंदाच्या पेप्सी आयपीएल स्पध्रेमधील प्रत्येक संघ उर्वरित आठ संघांशी दोनदा सामना करणार आहे. २०१२प्रमाणेच घरच्या आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर असे दोन सामने होतील. अव्वल चार संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरतील. पहिला पात्रता (क्वालिफायर-१) आणि बाद फेरीचा (एलिमिनेटर) असे दोन सामने चेन्नईच्या चेपॉकवर अनुक्रमे २१ आणि २२ मे रोजी होणार आहेत. त्यानंतर ईडन गार्डन्सवर २४ मे या दिवशी दुसरा पात्रता सामना (क्वालिफायर-२) तर २६ मे रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आयपीएलमध्ये समाविष्ट झालेल्या सनरायजर्स हैदराबादचा हा पहिलाच हंगाम असेल. घरच्या मैदानावर ५ एप्रिलला ते पुणे वॉरियर्सशी पहिला सामना खेळणार आहेत. आयपीएलच्या सहाव्या पर्वाचे सामने ११ ठिकाणी रंगणार आहेत.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2012 4:59 am

Web Title: ipl will start from 3 april 2013
टॅग Ipl
Next Stories
1 युवराजचा ‘सहारा’!
2 सनरायजर्सच्या प्रशिक्षकपदी टॉम मुडी
3 सायनाचे माघार प्रकरण गाजले!
Just Now!
X