News Flash

ISSF Shooting World Cup : अपूर्वी चंदेलाचा ‘सुवर्ण’वेध

10 मी. एअर रायफल प्रकारात मिळवलं सुवर्णपदक

नवी दिल्लीत सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अपूर्वी चंदेलाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मी. एअर रायफल प्रकारात अपूर्वीने भारताला विश्वचषक स्पर्धेत पदकाची कमाई करुन देत धडाकेबाज सुरुवात करुन दिली आहे. या स्पर्धेत भारताच्या अंजुम मुद्गील आणि एल्वेनिल वेल्वेरियन या खेळाडूही उतरल्या होत्या. मात्र पात्रता फेरीचा अडथळा दूर करत अपूर्वीने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. पात्रता फेरीत अपूर्वीने 629.3 गुणांची कमाई करत चौथं स्थान पटकावलं.

अंतिम फेरीत अपूर्वीची सुरुवात चांगली झाली नव्हती, मात्र वेळेतच तिने स्वतःला सावरत पुनरागमन केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात अपूर्वीने आपल्या कामगिरीत अधिक सुधारणा करत सर्वोत्तम स्थान गाठलं. यानंतर अपूर्वीने आपल्या कामगिरीत सातत्य कायम राखत चीनी खेळाडूंची झुंज मोडीत काढून सुवर्णपदकाची कमाई केली. चीनच्या रुओझू झाओने रौप्य तर हाँग झूने कांस्य पदकाची कमाई केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 3:05 pm

Web Title: issf world cup apurvi chandela bags gold medal in 10 m air rifle
Next Stories
1 विराटचा मैदानातील वावर एका योद्ध्याप्रमाणे – युजवेंद्र चहल
2 Pulwama Terror Attack : जी देशभावना, तीच आमचीही – विराट कोहली
3 पी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ विमानातून भरारी
Just Now!
X