पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने अखेरीस विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा अँडरसन हा पहिला जलदगती गोलंदाज ठरला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त फिरकीपटूंनाच ही किमया साधता आली होती.
Test wickets for @jimmy9!
England's King of Swing becomes the first pace bowler to reach the milestone. A true legend of the game
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 25, 2020
A historic wicket #ENGvPAKpic.twitter.com/W29iMRY06O
— ICC (@ICC) August 25, 2020
अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय असं चित्र तयार झालं होतं. परंतू अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर मैदानातील कर्मचाऱ्यांनी खेळपट्टी खेळण्यायोग्य बनवली. खेळाडू मैदानात आल्यानंतर अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला माघारी धाडत ६०० वा बळी घेतला.
इंग्लंडच्या एकाही गोलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. स्टुअर्ट ब्रॉड हा एकमेव इंग्लिश गोलंदाज या यादीत अँडरसनच्या मागे आहे. जाणून घेऊयात कसोटी क्रिकेटमध्ये ६०० बळींचा टप्पा पूर्ण करणारे गोलंदाज –
१) मुथय्या मुरलीधरन – ८०० बळी
२) शेन वॉर्न – ७०८ बळी
३) अनिल कुंबळे – ६१९ बळी
४) जेम्स अँडरसन – ६०० बळी*
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 9:26 pm