इंग्लंडच्या अ‍ॅशेस विजयात दमदार शतकांसह निर्णायक भूमिका बजावणाऱ्या जो रुटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली.
२४ वर्षीय रुटने कार्डिफ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत शतकी खेळी केली होती. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या नॉटिंगहॅमच्या खेळपट्टीवर रुटने शानदार शतक साकारले. या शतकाच्या बळावर रुटने क्रमवारीत स्टीव्हन स्मिथला मागे टाकत अव्वल स्थान ग्रहण केले. दक्षिण आफ्रिकेचा एबी डी’व्हिलियर्स दुसऱ्या तर स्टीव्हन स्मिथ तिसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेण्याची किमया करणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसरे स्थान गाठले आहे.