भारताची दुहेरीतील अनुभवी जोडी ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. या जोडीसह एच. एस. प्रणॉय आणि मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीही पराभूत झाली आह़े  
चीनच्या तिआन क्विंग आणि झाओ युनलेई जोडीने ज्वाला-अश्विनी जोडीवर २१-१०, २१-१३ असा विजय मिळवला.  इंग्लंडच्या राजीव ओस्युफने एच. एस. प्रणॉयवर १७-२१, २१-१९, २१-१८ अशी मात केली.   इंडोनेशियाच्या गिडइन मार्कुस फर्नाडी- केव्हिन संजया सुकामुलिजो जोडीने मनू अत्री-सुमीत रेड्डी जोडीला २१-१३, १९-२१, २१-१५ असे नमवले.