30 November 2020

News Flash

कपिल देव रुग्णालयातून घरी

क्रिकेट जगतातून मोठय़ा प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या

| October 25, 2020 09:45 pm

नवी दिल्ली : भारताचे पहिले विश्वचषक विजेते कर्णधार कपिलदेव यांना रविवारी रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने फोर्टिस रुग्णालयात त्यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

‘‘कपिलदेव यांना रविवारी दुपारी घरी पाठवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून लवकरच ते त्यांचे दैनंदिन काम करू शकतील. डॉ. अतुल माथूर यांचा गरजेप्रमाणे वैद्यकीय सल्ला कपिलदेव घेतील. डॉ. माथूर यांनीच कपिलदेव यांच्यावर अँजिओप्लास्टी केली आहे,’’ असे फोर्टिस रुग्णालयाने स्पष्ट केले.

कपिलदेव यांना शुक्रवारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त समजताच ते बरे व्हावेत, यासाठी क्रिकेट जगतातून मोठय़ा प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 9:45 pm

Web Title: kapil dev discharged from hospital after emergency angioplasty zws 70
Next Stories
1 Asian Online Chess : अंतिम फेरीत भारतीय महिलांची बाजी, पुरुषांचं रौप्यपदकावर समाधान
2 डाव मांडियेला : दातार  ठाऊक आहे का?
3 युरोपा लीग फुटबॉल : आर्सेनल, टॉटनहॅम, लेव्हरक्युसेनचे विजय
Just Now!
X