26 September 2020

News Flash

द्रविडने आत्मविश्वास दिला -करुण नायर

राजस्थान रॉयल्स आणि भारत ‘अ’ संघाकडून खेळताना कर्नाटकचा महान फलंदाज राहुल द्रविडने मला योग्य आत्मविश्वास दिला, असे भारतीय संघात प्रथमच स्थान देण्यात आलेल्या करुण नायरने

| August 27, 2015 02:44 am

राजस्थान रॉयल्स आणि भारत ‘अ’ संघाकडून खेळताना कर्नाटकचा महान फलंदाज राहुल द्रविडने मला योग्य आत्मविश्वास दिला, असे भारतीय संघात प्रथमच स्थान देण्यात आलेल्या करुण नायरने सांगितले.
‘‘द्रविडने माझ्या फलंदाजीला आत्मविश्वासाचे बळ दिले. नेहमी सकारात्मक पद्धतीने वावरणाऱ्या द्रविडने मला योग्य दिशा दिली. त्याने माझ्या फलंदाजीच्या तंत्रात बदल केला नाही, परंतु घडणाऱ्या वयात आवश्यक असलेला आत्मविश्वास मात्र नक्की दिला,’’ असे नायरने सांगितले.
‘‘द्रविड फारसा बोलत नाही. एखाद्या गोष्टीवर सविस्तर चर्चा करीत नाही. तुम्ही आयुष्यभर जसे खेळत आलात, तसेच मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला मात्र देतो,’’ अशा शब्दांत नायरने द्रविडचे कौतुक केले.
अन्य क्रिकेटपटूंप्रमाणेच भारतातर्फे खेळण्याचे स्वप्न बंगळुरूच्या २३ वर्षीय नायरने जोपासले होते. याबाबत तो म्हणाला, ‘‘प्रत्येक क्रिकेटपटूचे देशाकडून खेळण्याचे स्वप्न असते. माझे हेच स्वप्न सत्यात उतरले आहे. आता मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करायचे आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 2:44 am

Web Title: karun nair credits rahul dravid for national call up
Next Stories
1 कामगिरी करण्याचे दडपण असेल – ओझा
2 आशियाई बॉक्सिंग स्पर्धा : विकास कृष्णनला द्वितीय मानांकन
3 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, सेरेना अग्रमानांकित
Just Now!
X