25 February 2021

News Flash

Pro Kabaddi 7 : केदार जाधवच्या हस्ते पुणेरी पलटणच्या घरच्या हंगामाचा श्रीगणेशा

पुणेरी पलटण गुणतालिकेत दहाव्या स्थानावर

प्रो-कबड्डीचा सातवा हंगाम आता उत्तरार्धाकडे येऊन ठेपला आहे. १४ सप्टेंबरपासून पुणेरी पलटणच्या घरच्या मैदानावरील सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधवच्या हस्ते या हंगामाचा श्रीगणेशा होणार आहे. बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हे सामने रंगणार आहेत. पुणेरी पलटण विरुद्ध गुजरात फॉर्च्युनजाएंट आणि तामिळ थलायवाज विरुद्ध हरयाणा स्टिलर्स या सामन्यांना केदार जाधव हजर असणार आहे. यंदाच्या हंगामात पुणेरी पलटणला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. सध्या गुणतालिकेत पुणेरी पलटणचा संघ दहाव्या स्थानावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 1:04 pm

Web Title: kedhar jadhav to open the pune leg of vivo pro kabaddi season 7 on 14th september psd 91
Next Stories
1 रोहित कसोटीत सलामीला येऊ शकतो पण…..
2 क्रीडा मंत्रालय करणार महिला शक्तीचा सन्मान, ९ महिला खेळाडूंची पद्म पुरस्कारांसाठी शिफारस
3 विश्वचषकातला पराभव वेदनादायी मात्र पुढचा विचार करणं गरजेचं – हार्दिक पांड्या
Just Now!
X