कर्नाटक राज्यात श्रीनिवास गौडा या तरुणाने पारंपरिक कंबाला शर्यतीत आपल्या दोन बैलांसोबत पळताना, उसेन बोल्टचा विक्रम मोडला आणि सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरु झाली. अनेकांनी श्रीनिवासला भारताचा उसेन बोल्ट ही पदवी दिली, तर अनेक मान्यवर व्यक्तींनी श्रीनिवासला ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रशिक्षण मिळावं यासाठी थेट केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे मागणी केली. मात्र संपूर्ण देशभरात चर्चेचा विषय ठरलेली ही कंबाला शर्यत नेमकी खेळली तरी कशी जाते??

अवश्य वाचा – बोल्टचा विक्रम मोडणाऱ्या श्रीनिवास गौडाला धक्का, नवीन धावपटूने नोंदवला विक्रमी वेळ

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
Candidates Chess Tournament Russia Ian Nepomnia leads the way sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: नेपोम्नियाशीचे पारडे जड!
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…
Magnus Carlsen believes R Pragyanand is expected to perform well chess match
प्रज्ञानंदकडून चांगली कामगिरी अपेक्षित – कार्लसन

कर्नाटक राज्यातील उडीपी, दक्षिण कन्नडा जिल्ह्यांमध्ये हा खेळ खेळला जातो. Kambala Protection Maintenance and Training Academy या संस्थेमार्फत या शर्यतीचं खास प्रशिक्षणही दिलं जातं. याव्यतिरीक्त केरळ राज्यातील कासरगोड जिल्ह्यातही हा खेळ प्रसिद्ध आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आधी सराव आणि प्रशिक्षण घेणं गरजेचं असतं. प्रत्येक वर्षी या शर्यतीसाठी अर्ज मागवले जातात, ज्यातून काही ठराविक खेळाडूंची निवड होते. अंदाजे १० ते १२ दिवसांत प्रत्येक खेळाडूंना खडतर प्रशिक्षणातून जावं लागतं. सकाळी सव्वा पाच ते ९ वाजेपर्यंत खेळाडूंना धावण्यापासून आपल्यासोबत असणाऱ्या बैलांची काळजी घेण्याचंही प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये बैलांना खायला देण्यापासून ते त्यांना आंघोळ घालण्याची जबाबदारीही धावपटूंवर असते.

खेळाडूंना शर्यतीत बैलासोबत पळायचं असल्यामुळे त्यांच्या शरीराची काळजी घेणं, दररोज योग करणं याकडेही विशेष लक्ष दिलं जातं. महत्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेत उच्चशिक्षित तरुणही सहभागी होतात. २०१८ साली झालेल्या हंगामात या स्पर्धेत इंजिनीअर, वाणिज्य शाखेतील पदवीधरही सहभागी झाले होते. महत्वाची गोष्ट म्हणजे ही स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंना मोठ्या रकमेची बक्षिसं मिळतात. उसेन बोल्टचा विक्रम मोडणारा श्रीनिवास गौडा हा २०११ पासून ही कंबाला शर्यत खेळतो. आतापर्यंत या स्पर्धेत त्याने २३ पदकं जिंकलेली असून, प्रत्येक हंगामात त्याची कमाई ही ५ ते ७ लाखांच्या घरात असते.

अवश्य वाचा – भारताचा ‘उसेन बोल्ट’ म्हणतो, मला अ‍ॅथलीट बनण्यात रस नाही !