इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या नवव्या हंगामात बाद फेरी गाठण्याचे आव्हान संपुष्टात आलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सची कोलकाता नाइट रायडर्सशी लढत होत आहे. बाद फेरीच्या दृष्टीने कोलकातासाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. दुसरीकडे सन्मान वाचवण्याची पुण्याला संधी आहे. कोलकाताचा संघ पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर नव्या ऊर्जेने खेळण्यासाठी सज्ज आहे.
गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा ही सलामीवीरांची जोडी कोलकातासाठी जमेची बाजू आहे. मनीष पांडे तसेच सूर्यकुमार यादवकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. आंद्रे रसेल, युसूफ पठाण ही अष्टपैलू जोडी कोलकातासाठी अनेक सामन्यात तारणहार ठरली आहे. फिरकीपटू सुनील नरिनचा फॉर्म कोलकातासाठी चिंतेची बाब आहे. पुण्यासाठी अशोक दिंडा आणि अॅडम झंपा शानदार फॉर्ममध्ये आहेत. अजिंक्य रहाणे आणि उस्मान ख्वाजा यांच्याकडून मोठय़ा सलामीची अपेक्षा
सामन्याची वेळ : रात्री ८ पासून.
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/ एचडी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 14, 2016 3:12 am