22 September 2019

News Flash

कोमालिका बारीला जगज्जेतेपद

भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

कोमालिका बारी हिने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जपानच्या सोनोडा वाका हिला एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत पराभूत करत रिकव्‍‌र्ह कॅडेट गटात जगज्जेतेपदाला गवसणी घातली. भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

जमशेदपूर येथे जन्मलेल्या आणि टाटा तिरंदाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कोमालिकाने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ७-३ अशा फरकाने तिने अंतिम फेरीवर वर्चस्व गाजवले. रिकव्‍‌र्ह कॅडेट (१८ वर्षांखालील) गटात १७ वर्षीय कोमालिका ही भारताची दुसरी जगज्जेती ठरली आहे. यापूर्वी दीपिका कुमारीने २००९ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.

भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघाने बंदी घातल्यामुळे यापुढे भारतीय तिरंदाजांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. मात्र या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

जागतिक स्पर्धेत विजेती ठरल्याने मी अत्यंत आनंदी आहे. माझ्या प्रशिक्षकांमुळेच हे शक्य झाले. दीर्घ श्वास घेत असल्याने मला अचूक वेध घेता येत नव्हता. पण मी स्वत:ला संयम आणि शांत राहण्याचे बजावले. आत्मविश्वास उंचावल्यानंतर मी सुवर्णपदकावर कब्जा केला.    – कोमालिका बारी

First Published on August 26, 2019 1:41 am

Web Title: komalika bari won world youth archery championships mpg 94